शुभ आणि मंगल
आपण विवाह करतो, तेव्हा आपण हे गृहीत धरतो की, आता आपल्याला सुखाचं ‘गुलबकावलीचं फूल’ नक्की मिळणार; पण हेही तितकंच खरं आहे की, विवाह केल्याने ते फूल मिळत नसतं, तर त्या फुलाचा शोध जोडप्याने एकत्रितपणे घ्यायचा असतो. वैवाहिक जीवन ही एक सुंदर, सुखाने जगण्याची पद्धत आहे.
या वैवाहिक जीवनाच्या एकत्रित प्रवासाची तयारी कशी करायची? जीवनात येणार्या या बदलाला कसं सामोरं जायचं? या सर्व विषयातलं मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असतं आणि ते जर मानसशास्त्रानुसार आणि त्या विषयातल्या तज्ज्ञ मंडळींनी स्वत: केलं तर?
हेच या पुस्तकात घडलं आहे. विवाहासाठी स्वत:ला अनुरूप करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? इथपासून ते घटस्फोटाची वेळ आलीच, तर तो टाळायचा कसा? आणि झालाच विवाहविच्छेद, तर तो हाताळायचा कसा? विवाहाची निरंतरता कशी राखायची? यांविषयीची अगदी बारीकसारीक माहिती या पुस्तकात आहे.
या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे यामधून फक्त वैवाहिक जीवनाबद्दलचं कथन नाहीये, तर एकूणच जीवन जगत असताना निर्माण होणार्या प्रत्येक नात्याला कसं हाताळायचं, अगदी स्वत:बरोबरच्या नात्यालासुद्धा, याविषयी बहुमोल मार्गदर्शन यात आहे.
वाचकाला या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून वापर करता येईल. सर्वसामान्य वाचकाला बहुमोल आणि चर्चात्मक सल्ला देणारं हे एक पुस्तक आहे; जे सर्व वयाच्या प्रत्येकाने वाचायला हवं. शेवटी, असं सांगावंसं वाटतं की, विवाह संस्थांनी त्यांच्याकडे नोंद करणार्या उपवर आणि उपवधूला आवर्जून वाचायला सांगावं, असं हे पुस्तक आहे.
Be the first to review “शुभ आणि मंगल”
You must be logged in to post a review.