ज्योती म्हात्रे या मुंबई येथे लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी. ही पदवी संपादन केली. बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशल असिस्टंट या पदावर त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली. त्यांना सुरुवातीपासूनच प्रवासाची अत्यंत आवड आहे. आतापर्यंत भारताबरोबरच इतर ७५ देशांची सैर त्यांनी केली आहे. प्रवासासोबत त्यांना लिखाणाचीही आवड आहे. जगभरातील भ्रमंतीवर आधारित त्यांची दोन पुस्तके प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत.

Showing all 3 results