किशोर मंडलिक यांनी वयाच्या बाराव्या वर्षांपासून शालेय शिक्षणाबरोबरच आपले वडील तथा गुरू रामभाऊ मंडलिक म्हणजेच प. पू. गुरुवर्य श्री. नानामहाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नाथ संप्रदायाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. ङी. नानामहाराज यांचा वनौषधींवरदेखील गाढा अभ्यास असल्याने लेखकानेदेखील जंगलातील औषधी वनस्पतींचे ज्ञान आत्मसात केले. पुढे काही वर्षे नाथ पंथाचा अभ्यास, सेवा, जप, तप, अनुष्ठाने केल्यानंतर वयाच्या अठराव्या वर्षांपासून आपल्या वडिलांच्या सूचनेनुसार भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शनाचे कार्य सुरू केले. ते आजपर्यंत अव्याहतपणे चालू आहे. लेखक हे गृहस्थाश्रमी नाथपंथी आहेत. त्यांच्या घराण्यात मागील पाच पिढ्यांचा नाथसेवेचा वारसा आहेत. 1991मध्ये, श्री. नानामहाराज यांनी
श्री. शिवगोरक्ष आश्रम ट्रस्ट (मंदिर)ची स्थापना केली. ङी. नानामहाराज यांच्या समाधीनंतर ट्रस्टचे अध्यक्ष या नात्याने संपूर्ण कामकाज लेखक पाहतात. लेखक गेली अनेक वर्षे निरपेक्ष वृत्तीने समाजसेवा करत आहेत.

Showing the single result