Thumbnail

प्रतिक पुरी, हे मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांतून लेखन करणारे लेखक आणि मुक्त पत्रकार आहेत. ‘युनिक फिचर्स,’ ‘दिव्य मराठी,’ ‘डेलीहंट,’ येथे त्यांनी काम केले आहे. ‘वाफाळलेले दिवस,’ ‘चॅलेंज’ या त्यांच्या कादंब-या प्रकाशित झाल्या आहेत. ‘वैनतेयःएक गरुड योद्धा’ ही त्यांची कादंबरी या वर्षी प्रकाशित होत आहे. याशिवाय, त्यांची वीसहून जास्त ई-पुस्तके मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराथी भाषांमध्ये प्रकाशित झाली आहेत. अमेझॉन’ या संकेतस्थळावर त्यांच्या ‘द थाउजंड ब्लुम्स,’ आणि ‘व्हॉट फिशेस टॉट मी अबाऊट लव्ह अँड लाईफ?’ या दोन इंग्रजी कादंब-या उपलब्ध आहेत. वाचकांनी गौरवलेल्या ‘अक्षरलिपी’ या दिवाळी अंकाच्या संपादक मंडळावर ते आहेत. मराठी साहित्य व्यवहार आणि स्त्री-पुरुष समानता हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय असून त्याविषयी ते सातत्यानं लिहित-बोलत असतात.

Showing the single result