बुगडी माझी सांडली गं…

– Binding: Paperback
-ISBN13: 9789386455468
– Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Neela Kadam
-Product Code: VPG18181

250.00

बुगडी माझी सांडली गं…

मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे संगीतकार राम कदम यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. ‘बुगडी माझी सांडली गं…’ या पुस्तकात त्यांच्या सूनबाई प्रा. नीला कदम यांनी त्यांच्या आठवणींना व प्रसिद्ध गाण्यांना उजाळा दिला आहे. तसेच रामभाऊंविषयी त्यांच्या काळातील त्यांचा सहवास लाभलेल्या अनेक मान्यवर कलाकारांनी आपापल्या आठवणी येथे शब्दबद्ध केलेल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे रामभाऊंचे चरित्र नसले, तरी अनेक दिग्गजांच्या आठवणींमधून त्यांचे संगीतमय व्यक्तिमत्त्व उलगडते.

Author:
नीला कदम या एम.एड., एम.फिल. असून, शिवाजी मराठा संस्थेत त्यांनी 34 वर्षे अध्यापन केले आहे. प्राध्यापिका, समाजसेविका, नगरसेविका, लेखिका, नाट्यदिग्दर्शिका अशी अनेक वलयं लाभलेल्या नीला कदम या गेली 7 वर्षे राज्य शिक्षण मंडळावर उच्च माध्यमिक मराठी विभागाच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘बालचित्रवाणी’ या दूरदर्शनवरील कार्यक्रमात सुमारे 58 पटकथांचे लेखन, तसेच आकाशवाणीवरील ‘शालेय जगत’साठीही लेखन केले आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे हजारहून अधिक वेळा सूत्रसंचालन केले आहे. आकाश जिंकणार मी