E-Sushasan-ई-सुशासन

  • Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications (16 June 2024);
  • Mob-9168682204
  • Perfect Paperback ‏ : ‎ 208 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 9395481994
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-9395481991
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Packer ‏ : ‎ Vishwakarma Publications

250.00299.00

ई-सुशासन ही संकल्पना आधुनिक प्रशासनासाठी एक वरदान सिद्ध झालेली आहे. नागरिकांनी प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यासाठी शासकीय कार्यालयाला भेट देणे आवश्यक नाही; कारण केवळ एका संगणकाच्या माध्यमातून आपल्याला हवी ती सर्व कामे आज आपण सहजपणे करू शकतो. २४ x ७ पद्धतीने प्रशासनाचे कार्य अत्यंत कार्यक्षम पद्धतीने करण्यासाठी या ई-सुशासन पद्धतीचा विशेष उपयोग होत आहे. यामुळे नागरिकांचा प्रशासन प्रक्रियेवरील विश्वास निश्चितच वाढतो. प्रशासनाची गतिशीलता, कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढते. नागरिक आणि शासन यांच्यामधील संबंधांना अधिकाधिक विश्वासार्ह करण्याकरिता ई-सुशासन अत्यंत महत्त्वाची कार्यप्रणाली आहे. भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ई-सुशासन प्रणालीचा विविध कार्यांसाठी अनेक शासकीय विभागांमध्ये वापर केला जात आहे आणि त्याचे निश्चितच अत्यंत लाभदायक व सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. येत्या काही वर्षांमध्ये ई-सुशासन हे एकंदरीतच प्रशासन प्रक्रियेला आमूलाग्र बदलण्यास कारणीभूत ठरणार आहे, याबद्दल कोणाच्याही मनात संशय नाही. जसे-जसे संगणक आणि उपग्रहाच्या माध्यमातून होणारे संदेशवहन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणारे नवे बदल यांचा शासनासाठी वापर केला जाईल; त्याबरोबर प्रशासनाच्या संकल्पना, कार्यपद्धती आणि रचनेमध्ये मोठे बदल होणार आहेत, याचाच हा एक महत्त्वाचा संकेत आहे. सदर पुस्तकाच्या माध्यमातून श्री. संजय कप्तान आणि श्री. सुरेश देवढे यांनी ई-सुशासनाच्या संकल्पनेला अत्यंत सोप्या व ओघवत्या भाषेमध्ये स्पष्ट करण्याचा प्रयास केला आहे. तो निश्चित स्वागतार्ह आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “E-Sushasan-ई-सुशासन”