Sale!

स्वतंत्र दिननिमित्त विशेष ऑफर

1,975.00 1,185.00

-Binding: Paperback
-Language: Marathi
-Product Code: COMBO2018

Out of stock

SKU: COMBO2018 Category:

Description

हरवलेले सुशासन:
या पुस्तकात भ‘ष्टाचारात बुडलेले सरकार, काही थोड्या भांडवलशहांचे हितसंबंध, कायद्याचे राज्य, धर्मनिरपेक्षता, संस्थांची सचोटी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांसार‘या सार्वजनिक जीवनातील अनेक क्षेत्रांचा साकल्याने आढावा घेण्यात आला आहे. काही धोरणात्मक बदल घडवून आणण्याने देशाच्या प्रशासनात कसा बदल घडवून आणता येईल याबाबत चे परखड भाष्य ह्यामध्ये करण्यात आले आहे. ओघवत्या शैलीतील ‘हरवलेले प्रशासन’ या विचारप्रवर्तक पुस्तकात देशाच्या राजकारणातील समस्यांवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकण्यात आला आहे. भविष्यातील भारत कसा असावा हे ठरवण्यासाठी जनतेने माहितीपूर्ण पद्धतीने व जाणीवपूर्वक लोकशाहीत सहभागी होण्याचे हे पुस्तक आवाहन करते..

नेताजींच्या मृत्यूचे गूढ भारताचे सर्वात मोठे रहस्य:
‘इंडियाज बिगेस्ट कव्हर अप’ हा नेताजींच्या गूढाचा शोधक मर्मदृष्टीने घेतलेला वेध आहे. काल्पनिक कथांच्या उपकथानकांपेक्षाही ते अधिक आश्चर्यजनक आहे. अधिकृत सरकारी कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेऊन या पुस्तकातून न्याय देण्यात भारत सरकारने पद्धतशीरपणे आणलेले अडथळे स्पष्टपणे समोर आणले गेले आहेत. या कागदपत्रांपैकी बरीचशी कागदपत्रे अद्यापही गोपनीय आहेत. अद्यापही गोपनीय असलेल्या कागदपत्रांच्या छायाप्रती आणि त्यांच्यातील उतारे देण्यात आलेले हे भारतातील पहिलेच पुस्तक आहे. भारत, अमेरिका आणि ब्रिटन येथील माहितीच्या अधिकाराच्या कायद्यांचा उपयोग करून घेऊन अभिलेखागारामधील साहित्य आणि माहिती मिळवण्यात आली आहे.

वीर भरारी:
1971 चे भारत – पाक युद्ध अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरले. या युद्धात हवाई दलाचे काही अधिकारी युद्धकैदी म्हणून पाकच्या तावडीत सापडले. त्यांच्यापैकी ग्रुप कॅप्टन (निवृत्त) दिलीप परुळकर यांनी पाकिस्तानच्या हातावर तुरी देऊन मोठ्या शिताफीने त्यांच्या तुरुंगातून आपल्या इतर दोन सहकार्‍यांसह सुटका करून घेतली आणि भारतात परतण्याच्या मार्गावर आगेकूच सुरू केली. आपल्या दोन सहकार्‍यांच्या साहाय्याने शत्रूच्या तुरुंगातून निसटणारे ते आजतागायतचे हवाई दलातील एकमेव अधिकारी आहेत. त्यांनी सुटकेची महत्त्वाकांक्षी योजना कशी आखली? तिला कसा आकार दिला? शत्रूच्या हाती पुन्हा सापडल्यावर काय झाले? धैर्य, धाडस, प्रसंगावधान आणि थरार असलेल्या अनेक प्रसंगांनी भरलेली दिलीप यांच्या शौर्याची रोमहर्षक कथा.

गाथा बंत  सिहांची :
दुर्दम्य अशावादाने जगणार्‍या बंत सिंह या पंजाबी माणसाची ही कहाणी आहे. तशीच; ती अन्याय, अत्याचाराने दबून न जाता त्या राखेतून उठणार्‍या सामर्थ्याचीही कहाणी आहे.
बंत सिंहच्या बाबतीत स्वत:वर आणि आपल्या कुटुंबावर झालेल्या क्रूर अशा अत्याचारानंतर थोडेदेखील डगमगून न जाता त्यातूनही बाहेर पडून नव्याने जीवन जगण्याची उमेद, जिद्द यांची रोमांचक कथा या पुस्तकात चित्रित झालेली आहे.
पंजाबच्या दलित आणि क्रांतिकारी इतिहासाचा साहित्याचा मागोवा घेत लेखिका निरुपमा दत्त आपल्याला बंत सिंह यांच्या आयुष्याची कथा सांगतात. भारतीय समाजव्यस्थेचे दर्शनही पुस्तकातून प्रतीत होते.
हे पुस्तक म्हणजे चरित्र तर आहेच; परंतु अद्वितीय अशा प्रेरक शक्तीला मन:पूर्वक दिलेली ती दाद आहे.

छत्रपती शिवाजी महाराज:
छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष होते. मानवजातीच्या इतिहासात त्यांनी असामान्य कामगिरी करून आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. इतिहासात विशेष रस नसणार्या, तसेच वाचनाची आवड नसणार्या, पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल औत्सुक्य असणार्या असंख्य भारतीय व अभारतीय, तसेच किशोरवयातील मुलामुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासाला धरून संक्षिप्त चरित्र असणे अगत्याचे होते.

त्याचबरोबर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान कार्य व कारकिर्दीतून बर्याच गोष्टी शिकण्यासारख्या, शिकवण्यासारख्या आहेत. बदलती समाजव्यवस्था, विभक्त कुटुंबपद्धती, प्रथम दूरचित्रवाणी तर आता स्मार्टफोनमुळे आलेली अनावश्यक व्यस्तता व पाश्चात्त्य संस्कृतीचा वाढता प्रभाव यांमुळे किशोर वयोगटातील मुले योग्य संस्कार व मूल्यांच्या शिक्षणापासून वंचित झाली आहेत. निर्धार, परिश्रम, चारित्र्य, देशप्रेम, नेतृत्वगुण इत्यादी गुणांची, मूल्यांची त्यांना ओळख व्हावी, जाण व्हावी व त्याद्वारे प्रेरित होऊन त्यांना चारित्र्यसंपन्न, कर्तृत्ववान जीवन जगण्यास मदत व्हावी, या उद्देशाने सदर पुस्तकाची मांंडणी केली आहे.

माझा आयुष्याची पानं:
महारष्ट्राच्या आयपीएस अधिकारी मीरा चड्ढा – बोरवणकर यांच्याकडे तरुण मुली आणि महिला हयांनासांगणासाठी एक कथा आहे. हि कथा महत्त्वाची, प्रामाणिक आणि खूपच प्रसंगोचित आहे. आपली स्वप्नं साकार होताना बघणाऱ्या आणि समृद्ध जीवन व्यतीत करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक तरुणीनं हि कथा वाचायला हवी. हि कथा आहे, पंजाबच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होऊन पुरुषाचे वर्चस्व असलेल्या पोलीस खात्यात टिकून राहण्यासाठी धडपडणाऱ्या एका मुलीची. ती फक्त प्रयात्नच करीत राहिली, का तिची भरभराटी झाली?
स्वतःच्या करिअर मधले रंजक असे प्रसंग सांगताना मीरा त्या प्रसंगातून त्यांना कोणते धडे शिकायाला मिळाले, ह्या बदलही मार्गदर्शन करतात. आयुष्य आणि करिअरला योग्य दिशा देण्यासाठी तरुणांनी कृती कशी करावी, याचे काही महत्त्वपूर्ण मुद्दे ही त्या मांडताना. तरुणांमधील नेतृत्व कौशल्य वाढीला लागावं, असं त्यांना वाटतं. म्हणूनच,पोलीस अधिकारी मीरा यांनी दंडुक्याच्या जोडीला हातात लेखणीही घेण्याचा निर्णय घेतला

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वतंत्र दिननिमित्त विशेष ऑफर”

You may also like…