माझा मृत्यू होताच माझे प्रेत शक्यतो विद्युत-चितेवरच आळण्यात यावे. जुन्या पद्धतीप्रमाणे माझे प्रेत शक्यतो माणसांनी आपल्या खांद्यावर वाहून नेऊ नये किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीमधूनही नेऊ नये. तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत-स्मशानात नेले जावे. विद्युत-स्मशानातील सभागारात कोणास पाहिजे तर वेदमंत्र म्हणावेत, भाषणे करावीत. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद ठेवू नयेत. कारण ज्यांना दुःख होईल त्यांनीसुद्धा अशा प्रकारचे निदर्शन केल्याने त्या आंशिक हरताळानेसुद्धा समाजाला फार त्रास होतो. घरोघरच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो. जर कोणाला दुःख वाटले आणि त्याचे काहीतरी निदर्शन करावेसे वाटले, तर त्यांनी एखादी सभा घ्यावी किंवा वाटल्यास आपला शोक व्यक्तवावा. माझ्या निधनाविषयी कोणीही सुतक, विटाळ किंवा ज्यायोगे कुटुंबियांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो, अशा कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत किंवा पिंडप्रदान, त्या पिंडांना काकस्पर्श होईतो वाट पहात बसणे इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत. जर कोणाला माझ्या निधनानिमित्त नव्या अर्थी श्राद्ध म्हणून काही दानधर्म करावासा वाटला, तर तो कोणत्या तरी लोकांना प्रत्यक्ष लाभदायक आहे, अशा हिंदुत्वनिष्ठ संस्थांना दानधर्म करावा.
दि. १ ऑगस्ट १९६४
वि. दादा. सावरकर
Be the first to review “Krantikarakanche Kulpurush : Savarkar -क्रांतिकारकांचे कुलपुरुष सावरकर”
You must be logged in to post a review.