महारष्ट्राच्या आयपीएस अधिकारी मीरा चड्ढा – बोरवणकर यांच्याकडे तरुण मुली आणि महिला हयांनासांगणासाठी एक कथा आहे. हि कथा महत्त्वाची, प्रामाणिक आणि खूपच प्रसंगोचित आहे. आपली स्वप्नं साकार होताना बघणाऱ्या आणि समृद्ध जीवन व्यतीत करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक तरुणीनं हि कथा वाचायला हवी. हि कथा आहे, पंजाबच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होऊन पुरुषाचे वर्चस्व असलेल्या पोलीस खात्यात टिकून राहण्यासाठी धडपडणाऱ्या एका मुलीची. ती फक्त प्रयात्नच करीत राहिली, का तिची भरभराटी झाली?
स्वतःच्या करिअर मधले रंजक असे प्रसंग सांगताना मीरा त्या प्रसंगातून त्यांना कोणते धडे शिकायाला मिळाले, ह्या बदलही मार्गदर्शन करतात. आयुष्य आणि करिअरला योग्य दिशा देण्यासाठी तरुणांनी कृती कशी करावी, याचे काही महत्त्वपूर्ण मुद्दे ही त्या मांडताना. तरुणांमधील नेतृत्व कौशल्य वाढीला लागावं, असं त्यांना वाटतं. म्हणूनच,पोलीस अधिकारी मीरा यांनी दंडुक्याच्या जोडीला हातात लेखणीही घेण्याचा निर्णय घेतला