इनोव्हेशन आईनस्टाईनच्या नजरेतून
आईनस्टाईन हे जगातील एक जिवंत आश्चर्य कसे बनले? त्यांची महानता नक्की कशामुळे होती? मुख्य म्हणजे, आपण त्यांच्या आयुष्यावरून काय शिकलं पाहिजे?
अल्बर्ट आईनस्टाईन हे मागील शतकातील गौरवास्पद व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांचे विज्ञान व सैद्धान्तिक भौतिकशास्त्र यामधील योगदान हे केवळ अद्वितीय आहे. प्रत्येकजण त्यांना एल2 या समीकरणाचे जनक म्हणून ओळखतो. पण हे समीकरण इतके महत्त्वाचे का आहे? आईनस्टाईन यांनी लावलेले शोध आपल्या आयुष्याचा भाग कसे बनले? आणि माणूस म्हणून ते कसे होते?
या पुस्तकात वीरेंदर कपूर यांनी आईनस्टाईनच्या व्यक्तीमत्त्वाचे आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूचे विश्लेषण केले आहे. त्यातून आईनस्टाईन यांची बुद्धिमत्ता ठळकपणे दिसून येते, तसेच वाचकांना आईनस्टाईन यांचे नवनिर्मिती व नवीन शोध हे गुण आत्मसात करण्यास प्रेरणा मिळते. आईनस्टाईन यांचे योगदान हे वैज्ञानिक क्षेत्राच्याही पलीकडे कसे गेले आहे हे कपूर यांनी या पुस्तकात दाखवले आहे. आईनस्टाईन मानवी हक्कांचे पाठीराखे होते तसेच एक उदार मनाचे दाता होते. भौतिक सुखांपासून ते अलिप्त होते. आईनस्टाईनना कल्पनाशक्तीची व्यवहाराशी सांगड कशी घालायची, आपल्या संभाषण कौशल्याचा परिणामकारक उपयोग कसा करून घ्यायचा हे माहीत होतं आणि हे सर्व करताना ते आपल्या स्वभावातील मिश्किलपणा जपत होते. या आणि यांसारख्या इतर अनेक गुणांनी त्यांना वैशिष्ट्यपूर्ण बनवलं. या गुणांचे अनुकरण करणे तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मोलाची मदत करेल.
प्रबळ सत्य मांडणारे, साध्या, स्पष्ट शब्दातील, “इनोव्हेशन आईनस्टाईनच्या नजरेतून” हे प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक आहे. मग तो वाचक कोणत्याही क्षेत्रातील असो. आपल्या सामर्थ्याचा पुरेपुर वापर कसा करावा ते समजून घेण्यासाठी हे पुस्तक संग्रही हवेच!
Be the first to review “इनोव्हेशन आईनस्टाईनच्या नजरेतून”
You must be logged in to post a review.