छत्रपती शिवाजी महाराज:चरित्र आणि शिकवण
छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष होते. मानवजातीच्या इतिहासात त्यांनी असामान्य कामगिरी करून आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. इतिहासात विशेष रस नसणार्या, तसेच वाचनाची आवड नसणार्या, पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल औत्सुक्य असणार्या असंख्य भारतीय व अभारतीय, तसेच किशोरवयातील मुलामुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासाला धरून संक्षिप्त चरित्र असणे अगत्याचे होते.
त्याचबरोबर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान कार्य व कारकिर्दीतून बर्याच गोष्टी शिकण्यासारख्या, शिकवण्यासारख्या आहेत. बदलती समाजव्यवस्था, विभक्त कुटुंबपद्धती, प्रथम दूरचित्रवाणी तर आता स्मार्टफोनमुळे आलेली अनावश्यक व्यस्तता व पाश्चात्त्य संस्कृतीचा वाढता प्रभाव यांमुळे किशोर वयोगटातील मुले योग्य संस्कार व मूल्यांच्या शिक्षणापासून वंचित झाली आहेत. निर्धार, परिश्रम, चारित्र्य, देशप्रेम, नेतृत्वगुण इत्यादी गुणांची, मूल्यांची त्यांना ओळख व्हावी, जाण व्हावी व त्याद्वारे प्रेरित होऊन त्यांना चारित्र्यसंपन्न, कर्तृत्ववान जीवन जगण्यास मदत व्हावी, या उद्देशाने सदर पुस्तकाची मांंडणी केली आहे.
Be the first to review “छत्रपती शिवाजी महाराज – चरित्र आणि शिकवण”
You must be logged in to post a review.