जगू आनंदे

-Binding: Paperback
-Language: EMarathi
-ISBN:9789390869855
-Publication Year: 2021
-Author: Late Dr. S. V. Deshpande
-Product Code: VPG19239

190.00

जगू आनंदे

‘जगू आनंदे’ हे पुस्तक मानसशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र यांवर आधारित आहे. पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवत असताना, त्यांच्या बाबतींतल्या विविध समस्या आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनाच्या साहाय्याने त्यांची उकल करण्यासाठी लेखकाने योजलेले उपाय ह्या गोष्टी अधोरेखित करणारे हे पुस्तक आहे. मानवी वर्तनावर आधारित समस्यांबाबतचे सामान्य जनांचे गैरसमजही या पुस्तकद्वारे दूर होण्यास मदत होते. विविध समस्या दूर होऊन जीवन आनंदाने जगता यावे, यासाठी मौलिक मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे. तसेच सामान्य जनांना मानसशास्त्रीय संकल्पनाही या पुस्तकाच्या साहाय्याने चांगल्या रीतीने स्पष्ट होतात. मन आणि वर्तन यांच्या सुसंवादाचा उत्कृष्ट मंत्र हे पुस्तक देते.

*           मानसशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र यांवर आधारित पुस्तक.

*           विविध वर्तनसमस्या आणि त्याचे निराकरण यादृष्टीने महत्त्वपूर्ण बाबी उलगडणारे पुस्तक.

*           मानसशास्त्रीय संकल्पनांच्या आधारे समस्यांची उकल करून मन आणि वर्तन यांच्या सुसंवादाचा मंत्र देणारे

Brands
कै . डॉ. सु. वा. देशपांडे यांना मानसशास्त्राच्या अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी नागपूर महाविद्यालयाचा मानसशास्त्र विभाग, नागपूर व पुणे विद्यापीठ या संस्थांमध्ये मानसशास्त्राचे अध्यापन केले. महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी या प्रशिक्षणसंस्थेत ते १९८९ ते १९९३ या काळात वर्तनशास्त्राचे प्राध्यापक व मानस संशोधन विकास विभागाचे प्रमुख होते. डॉ. देशपांडे यांना संशोधनाचा बराच अनुभव आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध संशोधन पत्रिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. तसेच मानसशास्त्राच्या अनेक परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जगू आनंदे”