समग्र माते नर्मदे
नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्प व त्याच्या विरोधात उभे राहिलेले नर्मदा बचाव आंदोलन हा विकास विरुद्ध पर्यावरण आणि मानवी विस्थापन या संघर्षातील मैलाचा दगड ठरला. या प्रकल्पाच्या मूळ संकल्पनेपासून त्याच्या पूर्तीपर्यंत सुमारे ७० वर्षांचा प्रदीर्घ काळ गेला, त्याच्या विरोधातील आंदोलन ३० वर्षांहून अधिक काळ चालले. कोणत्याही प्रकल्पाने अनुभवलेल्या लढ्यापेक्षा हा लढा अनेक पटींनी तीव्र व टोकदार होता.
प्रकल्पामुळे होणारी पर्यावरणीय हानी व मानवी विस्थापन ही आंदोलकांची बाजू होती; पण दुसऱ्या बाजूने हा प्रकल्प खरोखरच खलनायक होता का?
संशोधक दत्तप्रसाद दाभोळकर यांनी अभ्यास करून, दोन्ही बाजू जाणून घेऊन प्रकल्पाची बाजू वस्तुनिष्ठपणे समोर ठेवणारे ‘समग्र माते नर्मदे’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाने विकास विरुद्ध पर्यावरण ही चर्चा समतोल विकासाच्या मुद्द्यावर आणली. आज आपल्या राज्यातील – देशातील विविध प्रकारच्या विकास प्रकल्पांना होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचे औचित्य कायम आहे. पर्यावरणाचे रक्षण हवे, पण विकासही हवा, विस्थापनाला सक्षम व सुदृढ पुनर्वसनाचे उत्तर हवे. दोहोंची सांगड घालणारा विकास समृद्धीला पोषक ठरतो, हे या पुस्तकातून अधोरेखित होते.
Be the first to review “समग्र माते नर्मदे”
You must be logged in to post a review.