डॉ. अशोक राणा हे अत्यंत अभ्यासू वृत्तीचे, मराठी भाषा आणि साहित्य यांचे अध्यापक, वक्ते म्हणून विख्यात आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमधून त्यांनी वाचलेल्या शोधनिबंधांमधून त्यांच्या अभ्यासू व चिकित्सक वृत्तीचा प्रत्यय अभ्यासकांना, तज्ज्ञांना आणि रसिक श्रोत्यांनाही आला आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध नियतकालिकांमधूनही प्रसिद्ध झालेले आहेत. ते स्वतः परिवर्तनवादी विचारांचे असल्यामुळे त्यांनी सातत्याने परिवर्तनवादी विचारांच्या चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. चिकित्सक वृत्तीने अत्यंत महत्त्वाच्या व गंभीर विषयांवर त्यांची विपुल ग्रंथसंपदाही आहे. हे येथे एवढ्यासाठी सांगितले की, अशा गांभीयनि लेखन करणाऱ्या, वाचकप्रिय अशा विचारवंताने लिहिलेल्या या ग्रंथातील लेखनाचा वाचकांना, जिज्ञासूंना अंदाज यावा.
या ग्रंथात ‘गुढीपाडवा व वर्षारंभ’, ‘रामनवमी’, ‘हनुमान जयंती’, ‘बुद्धपौर्णिमा’, ‘वटसावित्री व्रताचे मूळ’, ‘चातुर्मास्याचे रहस्य’, ‘नागपंचमी’, ‘श्रावणी पौर्णिमा’, ‘पोळा व पिठोरी अमावस्या’, ‘गौरी गणपती’, ‘पितृपक्ष व पितरलोक’, ‘शक्तिपूजेचा उत्सव-नवरात्र’, ‘दसरा व रावण दहन’, ‘गोवत्स द्वादशी’, ‘महानायकांना खलनायक करणारी दिवाळी’, ‘कोजागरी व भुलाबाई’, ‘मकरसंक्रांत’, ‘महाशिवरात्री’ असे एकोणीस लेख समाविष्ट आहेत. अर्थात, हे सर्वच लेख म्हणजे, एक एक सण किंवा उत्सव यांचा परिचय देणारे आहेत असे नाही; तर त्यात काही मंगल व पवित्र समजले जाणारे दिवस व व्रत यांची महती आणि माहिती सांगणारेही आहेत आणि ते खूप चिकित्सकपणे लिहिलेले आहेत.
डॉ. वासुदेव मुलाटे (प्रस्तावनेमधून )
Be the first to review “Sananchi Sataykatha [सणांची सत्यकथा ]”
You must be logged in to post a review.