Thumbnail

चित्रकार-कवी भास्कर हांडे हे मूळचे मावळ भागातले. उपायोजित कलेची पदविका प्राप्त केल्यानंतर कलाक्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी ते नेदरलँडमध्ये गेले आणि तेथील कलावर्तुळात त्यांनी आपला जम बसविला. तुकोबांच्या अभंगगाथेमधील अभंगांतून स्फुरलेल्या चित्रशिल्पांचे प्रदर्शन भरविण्याची संकल्पना त्यांनी साकारली. अभंगगाथेवरील दृश्यमाध्यमातले पहिले भाष्य म्हणून त्यांच्या चित्रशिल्प प्रदर्शनाचा उल्लेख केला जातो.