Thumbnail

डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी पुणे येथील बी.जे.मेडिकल कॉलेजमधून ‘स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र’ या विषयात एम.डी. ही पदवी संपादन केली आहे. 1997 पासून ते वाई (जि. सातारा) येथे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत.
त्याचप्रमाणे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी ‘निमंत्रित वक्ता’ म्हणून आपला सहभाग नोंदवला आहे. याशिवाय स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र-तज्ज्ञ संघटनेच्या संचालक मंडळात, तसेच राष्ट्रीय कामविज्ञान समितीच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.
ह्याबरोबरच भाषांतरकार तसेच ब्लॉग लेखक आणि नाटककार अशीही त्यांची ‘विशेष’ ओळख आहे. स्त्रियांच्या आरोग्याबाबतीतल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे 2007 मध्ये ‘डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.