Thumbnail

डेल कार्नेगी हे सेल्फ-हेल्प म्हणजेच ‘स्व-मदत’ या प्रकाराचे जनक म्हणून प्रसिद्ध आहेत. ते अमेरिकन लेखक व वक्ते आहेत. त्यांनी स्व-सुधारणा या विषयात अनेक कोर्सेस सुरू केले. 1912मध्ये त्यांनी ‘डेल कार्नेगी प्रशिक्षण केंद्र’ स्थापन केले. त्यामध्ये आंतरव्यक्तीसंबंध आणि व्यावसायिक कौशल्ये यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रशिक्षण दिले जात होते.