ल. सि. जाधव यांची 18 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये ‘सुंभ आणि पीळ’, ‘पराभूत धर्म’ यांसारख्या 8 कादंबर्या, ‘परतीचे पक्षी’, ‘पाथेय’ यांसारखे 5 कवितासंग्रह आणि 4 बालवाङ्मयाची पुस्तके यांचा समावेश आहे. त्यांनी ‘होरपळ’ हे आत्मकथनदेखील लिहिले आहे. ते कन्नड, हिंदी, कोकणी व इंग्रजी या चार भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. त्यांच्या या साहित्यसेवेला एकूण 11 महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये ‘होरपळ’ या आत्मकथनाला राज्य शासनाचा 2012चा पुरस्कार, ‘सुंभ आणि पीळ’ या कादंबरीला राज्य शासनाचा 2014चा पुरस्कार आणि म.सा.प.चा 2015चा पुरस्कार महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर डॉ. निर्मलकुमार फडकुले साहित्य सेवा पुरस्कार 2016 देखील त्यांना मिळालेला आहे.
No products were found matching your selection.

