Thumbnail

कै . डॉ. सु. वा. देशपांडे यांना मानसशास्त्राच्या अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी नागपूर महाविद्यालयाचा मानसशास्त्र विभाग, नागपूर व पुणे विद्यापीठ या संस्थांमध्ये मानसशास्त्राचे अध्यापन केले. महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी या प्रशिक्षणसंस्थेत ते १९८९ ते १९९३ या काळात वर्तनशास्त्राचे प्राध्यापक व मानस संशोधन विकास विभागाचे प्रमुख होते. डॉ. देशपांडे यांना संशोधनाचा बराच अनुभव आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध संशोधन पत्रिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. तसेच मानसशास्त्राच्या अनेक परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत.