Thumbnail

शरद पुराणिक हे विज्ञान लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची लालमसी (कथासंग्रह), रिफ्लेक्टर्स (विज्ञान कथासंग्रह), चौथी कसम (विनोदी कथासंग्रह), सत्यमेव जयते (बाल एकांकिका संग्रह) आणि मंगळदेवाची कहाणी (विज्ञान कथासंग्रह) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 2002मध्ये विज्ञान शिक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी ‘नाशिक कवी’ या संस्थेची स्थापना 2003मध्ये केली. त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्काराबरोबरच इतर अनेक महत्त्वाचे पुरस्कारदेखील मिळालेले आहेत. अमरावती विद्यापीठ व मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांनी आयोजित केलेल्या 2018च्या विज्ञान कथा लेखनाच्या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे.