जगातील सर्व धर्मामध्ये असणारी समानता, धर्मग्रंथांमध्ये प्रतिबिंबित झालेली असते. या समानतेचा आणि विषयपरत्वे काही वेगळेपणाचाही मागोवा घ्यावा लागतो. धर्मातील कर्म मानवी जीवनाला गती आणि अर्थ प्राप्त करून देते. कर्माला विवेकाचा आणि नैतिकतेचा आधार असावा लागतो.
कर्माच्या प्रयोजनाला भगवद्गीता आणि कुरआन या दोन्ही धर्मग्रंथांमध्ये दिल्या गेलेल्या महत्त्वात कमालीचे साम्य आहे. ईश्वरासंबंधी असणाऱ्या संकल्पना काही निरीक्षरवादी धर्म वगळता, सर्वत्र सारख्याच आहेत. विशेषकरून सनातन हिंदू धर्मात आणि इस्लाममध्ये एकेश्वरवाद आणि अनेकेश्वरवाद हा महत्त्वाचा फरक वगळता, अनेक बाबतीत समानताही आहे, हे भगवद्गीता आणि कुरआन यांच्या अभ्यासातून विशद करण्याचा; तसेच या दोन्ही धर्मग्रंथांत असलेली कर्मयोगाची साम्यस्थळे दर्शविण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केला आहे. त्याचप्रमाणे कर्मयोगाशी संबंधित इतर संकल्पनांचे विश्लेषणदेखील या ग्रंथात केलेले आहे.
Be the first to review “Bhagwatgeeta Ani Kuranamadhil Karmayog Parichay-भगवद्गीता आणि कुरआनमधील कर्मयोग परिचय”
You must be logged in to post a review.