बिंटू आणि टिंबू जलसफर
‘पाण्या’ सारख्या अत्यावश्यक आणि महत्त्वाच्या घटकाची शास्त्रीय स्वरूपाची माहिती बिंटू आणि टिंबू ह्यांच्याकडून आपल्यासमोर उलगडत जाते.
पाण्याच्या विविध अवस्था जसे की, बाष्पीभवन, पाण्याचे गोठणे, उत्कलन अशा अनेकविध शास्त्रीय घटनांना स्पर्श करतात. पाणी ह्या घटकामागचे विज्ञान त्यामधून स्पष्ट होते.
अत्यंत खेळकर अशा भाषाशैलीतून उलगडवून दाखवलेली शास्त्रीय माहिती हे या पुस्तकाचे लेखनवैशिष्ट्य आहे. इथे लहान मुलांना अत्यंत मनोरंजक पद्धतीने पाण्यामागचे विज्ञान समजते. चला, बिंटू-टिंबूसोबत आपणही ह्या जलसफरीवर जाऊ या.