Dalitanche baba-दलितांचे बाबा

  • Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications (1 January 2024);
  • Mob-9168682204
  • Perfect Paperback ‏ : ‎ 107 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 9389624754
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-9389624755
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Packer ‏ : ‎ Vishwakarma Publications

140.00160.00

डॉ. आंबेडकरांएवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वत्तेचा आणि कर्तृत्वाचा दुसरा एकहि महाराष्ट्रीय माणूस आज आम्हांला तरी दिसत नाहीं। भांडारकर, टिळक, रानडे, तेलंग, केतकर आणि राजवाडे ह्यांची निर्भेळ ज्ञानोपासनेची परंपरा तितक्याच तपश्चर्येनें आणि अधिकारानें पुढे चालवणारा महर्षि महाराष्ट्रांत आज कोण आहे हैं आम्ही विचारतों ! घटनासमितीमध्यें डॉ. आंबेडकर ह्यांनी अखंड भारताच्या पुरस्काराची जी तेजस्वी घोषणा केली, त्या वेळीं त्यांच्या प्रखर देशभक्त्तत्रचें साऱ्या देशाला दर्शन झालें; आणि तेव्हापासून त्यांच्या चरित्राबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल मला विलक्षण आदर वाटू लागला. त्यानंतर त्यांचा नि माझा परिचय झाला आणि त्या परिचयाचे रूपान्तर दृढ स्नेहांत झालें. त्यांच्या सहवासांत येण्याची कित्येकदां संधि मिळाली. त्या वेळीं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचें मला जें देदीप्यमान दर्शन झालें, त्याच्या स्मरणानें अद्यापही भावना दिपून जातात. आंबेडकर ह्यांच्याएवढा विशाल बुद्धिमत्तेचा आणि प्रचंड धैर्याचा पुरुष भारतांत पुन्हां होणें नाहीं. भारताच्या राजकीय, धार्मिक आणि सामाजिक इतिहासांतली त्यांची कामगिरी अमर आहे. कोट्यवधि दलितांच्या जीवनांत क्रांति करून त्यांनीं भारताच्या सामाजिक विचारांत आणि तत्त्वज्ञानांत मोलाची भर घातली आहे. तथापि, आंबेडकरांच्या अथांग विद्वत्तेची आणि विचारांची अद्याप भारताला पुष्कळच ओळख व्हायची आहे. ती ज्या दिवशीं समग्रपणें होईल, त्या दिवशीं त्यांच्या कर्तृत्वाचा जनतेला साक्षात्कार होईल! भारताच्या इतिहासांत एक युगप्रवर्तक पुरुष असाच डॉ. आंबेडकरांचा उल्लेख करावा लागेल. –

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dalitanche baba-दलितांचे बाबा”