घुंगूरनाद
‘कथक’ ह्या शास्त्रीय नृत्यप्रकारावर आधारित ‘घुंगूरनाद’ हे मीना शेटे-संभू ह्यांचे पुस्तक आहे.
कथकच्या घराण्यांची परिपूर्ण माहिती घराण्यांच्या वैशिष्ट्यांसह त्यांनी उलगडली आहे. त्यात कथकला समृद्ध करणार्या बुजुर्ग कलाकारांचे महत्त्वपूर्ण योगदान हेदेखील अधोरेखित झाले आहे.
कथकचा इतिहास, घराण्यांची वैशिष्ट्ये, कथकची आजची स्थिती, त्यात होत जाणारे बदल ह्या सगळ्यांचा लेखाजोखा अतिशय ओघवत्या शैलीत लेखिकेने मांडला आहे.
पंडित रामलाल बरेठ आणि पंडित बिरजू महाराजजी ह्यांच्या प्रस्तावना या पुस्तकाला लाभल्या आहेत, हे त्याचे ‘विशेष’ असे वैशिष्ट्य म्हणता येईल.
कथकविषयी सर्वार्थाने परिपूर्ण, संशोधनात्मक आणि मार्गदर्शनपर असे ‘घुंगूरनाद’ प्रत्येकाच्या संग्रही असावे, असेच आहे.
Be the first to review “घुंगूरनाद”
You must be logged in to post a review.