हॅलो मी प्रतिमानाव
या संग्रहात विज्ञान कथांचा समावेश आहे.
प्रतिमानव म्हणजे मानवाची हुबेहूब प्रतिकृती. यंत्रमानवाची पुढची पिढी किंवा आवृत्ती म्हणजे प्रतिमानव. या ‘प्रतिमानव’ संकल्पनेवर आधारित उत्कंठावर्धक कथांचा यात समावेश आहे.
‘कालयंत्र’ किंवा ‘टाइम मशीन’ या संकल्पनेवर आधारित कथाही या संग्रहात आहेत. कालयंत्रातून भूतकाळात किंवा भविष्यात जाणे शक्य झाल्याने काय गमतीजमती घडू शकतील, याबद्दल मजेदार कथा लेखकाने लिहिल्या आहेत.
माणसाला मेंदू बदलण्यात – यांत्रिक मेंदूच्या प्रत्यारोपणात यश आल्याची कल्पना लेखकाने केली आहे. माणसाच्या मेंदूइतकाच यांत्रिक मेंदू कार्यक्षम आहे का? हे या कथा वाचून तुम्ही स्वत:च जाणून घ्या!
विज्ञान संकल्पनांच्या आधारे वेगळ्या – दुसर्या जगाची अद्भुत सफर या पुस्तकातून लेखकाने घडवली आहे. तिचा अनुभव घेतलाच पाहिजे!
Be the first to review “हॅलो, मी प्रतिमानव!”
You must be logged in to post a review.