Ignite Your Inner Power-इग्नाइट युवर इनर पॉवर -जागरूकतेने जगण्याची कला

  • Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications; First Edition (24 December 2024)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Perfect Paperback ‏ : ‎ 244 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 9389624924
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-9389624922
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Item Weight ‏ : ‎ 125 g
  • Dimensions ‏ : ‎ 14 x 1.2 x 21 cm
  • Packer ‏ : ‎ Vishwakarma Publications
  • Generic Name ‏ : ‎ Books

280.00350.00

Compare

तणावमुक्त औवनाची २५ सूत्रे (25 Essentials to Happy Living) आणि ‘शोथ अंतरीचा…. मार्ग समृद्धीचा’ (Enrich Life), या आमच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या दोन यशस्वी पुस्तकांच्या पुरस्कार विजेत्या लेखिका, प्रीती पाठक आता त्यांच्या वाचकांसाठी ‘इग्नाइट युवर इनर पॉवर : जागरूकतेने जगण्याची कला’ हे भावनांच्या जागरूकतेवरील पुस्तक आणत आहेत. ‘भावनिक कल्याण’ या त्रयीतील हे त्यांचे शेवटचे पुस्तक आहे.
या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे, प्रीतीचे 4A सजगता प्रारूप हे चार स्तंभांवर आधारित आहे; जागरूक राहा, स्वीकारा, कृती करा आणि सुधारणा करा. आपण बहुतेक वेळा आपल्या भावना, संवेदना आणि दृष्टिकोनांकडे दुर्लक्ष करतो. भावनांबद्दल सजग राहणे आपल्याला आपण अनुभवत असलेल्या भावना आणि संवेदना किंवा आपण विकसित केलेल्या दृष्टिकोनांबद्दल जागरूक होण्यास मदत करते. जागरुकता आपले मन स्वीकारशील बनवते. आपल्याला काय, का आणि कसे वाटते, याचा स्वीकार करण्याऐवजी ते नाकारण्याकडे आपला कल असतो. त्यामुळे आपली नव्वद टक्के लढाई स्वतःशीच असते. आपल्या भावनांचा स्वीकार करून, आपण सकारात्मक त्वरित कृतीसह आपल्या समस्यांवर मात करण्यासाठी आणि आपले आयुष्य सुधारण्यासाठी स्वतला सक्षम बनवतो.
प्रीती त्यांच्या सोप्या आणि सुस्पष्ट शैलीत आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावनिक आरोग्यावरील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतात. जीवनाच्या विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींनी सांगितलेल्या प्रेरणादायी केस स्टडीजने या पुस्तकाचे वाचन मनोरंजक झाले आहे.

इग्नाइट युवर इनर पॉवर : जागरूकतेने जगण्याची कला’ हा चार प्रभावी पाय-यांमध्ये जागरूकतेचा सराव करून सशक्त जीवन जगण्यासाठी अत्यंत उपयुक्त ग्रंथ आहे. – शिवी वर्मा, संपादक, लाईफ पॉझिटिव्ह

इग्नाइट युवर इनर पॉवर : जागरूकतेने जगण्याची कला’ ही एक उत्कृष्ट कलाकृती आहे. प्रीती तिच्या अनोख्या शैलीत आनंदी आणि अर्थपूर्ण जीवनाचे साधे सार प्रकाशात आणते. – दिलीप आर्य, अभिनेता

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ignite Your Inner Power-इग्नाइट युवर इनर पॉवर -जागरूकतेने जगण्याची कला”