Jhop Nit,Arogya Phit – झोप नीट, आरोग्य फिट ! झोपेचं आरोग्याशी नातं उलगडणारी उपयुक्त रोजनिशी

  • Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications; First Edition (16 July 2025)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Perfect Paperback ‏ : ‎ 96 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 9349001322
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-9349001329
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Item Weight ‏ : ‎ 125 g
  • Dimensions ‏ : ‎ 14 x 1 x 21 cm
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Packer ‏ : ‎ Vishwakarma Publications
  • Generic Name ‏ : ‎ Books

140.00150.00

आपल्यापैकी अनेक लोकांना झोप उडवायची सवय असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपले डोळे जड होतात, काही सुचेनासे होते आणि आपण सतत आळसावलेले असतो. आपल्यापैकी काही लोक धोरणे व रात्रभर बिछान्यात तळमळत राहणे यांसारख्या झोपेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. पर्यायी सकाळी उठून त्यांना ताजेतवाने वाटत नाही, पण चावर ते काही उपायही करत नाहीत. चांगली झोप आपल्याला अधिक कार्यक्षम बनवते आणि आपली कामगिरी कैक पटीने सुधारते, मग ती अभ्यासातली, खेळातली किंवा ऑफिसातली कसलीही असू देत. तरीही आनंदाची बाब अशी आहे की, झोपेच्या समस्या टाळताही येतात व त्यांवर उपचारदेखील करता येतात. ही रोजनिशी तुम्हाला तुमची झोप समजून घेण्यास चांगल्या प्रकारे मदत करेल. यात सोप्या शब्दांत दिल्या गेलेल्या प्रकरणांतून तुम्हाला तुमच्या निद्रा समस्येबद्दल अधिक जाणून घेता येईल. तुम्हाला फक्त माहितीच मिळणार नाही, तर ती निद्रा समस्या बळावण्याअगोदर त्यावर वैद्यकीय उपचार कशा प्रकारे घेता येतील, हेसुद्धा समजेल. आता तुम्ही झोपेतून खऱ्या अर्थाने जागे व्हाल ! चांगल्या झोपेमुळे समाजाची कार्यक्षमता वाढते. या पुस्तकात ‘प्रेझेन्टिझम’ म्हणजेच ‘उपस्थिती’ ही संकल्पना विस्तृतपूर्वक मांडण्यात आली आहे. याचाच अर्थ, माणूस शरीराने जरी उपस्थित असला, तरी झोपेअभावी त्याचे कामात लक्ष लागत नाही, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता साहजिकच घटते. या गोष्टीचे सामाजिक स्तरावर भान असणे आवश्यक आहे. या पुस्तकात समाजाला मदत करण्याच्या दृष्टीने शांत झोपेसाठी उपाय सुचवण्यात आले आहेत. चांगली झोप घ्या व यशस्वी व्हा! हे पुस्तक दैनंदिन निद्रा समस्यांवर व त्यांमुळे उद्भवणाऱ्या आजारांवर भाष्य करते. वाचकाला चांगल्या झोपेचे महत्त्व पटवून देते. एक वैयक्तिक रोजनिशी असण्यासोबतच हे पुस्तक आवश्यक ते ज्ञान आणि माहितीदेखील प्रदान करते. तुम्हाला रात्रभर जागायची किंवा सकाळी खूप लवकर उठायची सवय असली, तर हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकातून तुम्हाला तुमच्या निद्रा समस्येबद्दल आवश्यक ती माहिती मिळेल.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Jhop Nit,Arogya Phit – झोप नीट, आरोग्य फिट ! झोपेचं आरोग्याशी नातं उलगडणारी उपयुक्त रोजनिशी”