सुरेखा शहा यांची ‘विवाह’ या पारंपरिक विषयावरची; परंतु अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली ही कादंबरी आहे. हजारो वर्षांपासून प्रचलित असलेल्या ‘भारतीय विवाहसंस्थेचे’ दर्शन या कादंबरीत घडते. पुराणकाळापासून अस्तित्वात असणारे विवाहांचे प्रकार – विवाहसंस्कार, आणि विवाहविधी यांबाबतची रंजक अशी माहिती तितक्याच हलक्याफुलक्या शैलीत त्या-त्या कथेच्या स्वरूपात गुंफण करून लेखिकेने शब्दबद्ध केली आहे. अलीकडच्या काळातील बदलत्या कौटुंबिक, सामाजिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तर ‘विवाहसंस्कार’ या घटकाचे असणारे महत्त्व या कादंबरीतून प्रतीत होते. वाचकाला वाचनाचा आगळावेगळा प्रत्यय देणारी ही कादंबरी आपल्या पुस्तकसंग्रहात असायलाच हवी.
कुर्यात सदा मंगलम्!
-Binding: Paperback
-ISBN13: 9789386455895
-Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Surekha Saha
-Product Code: VPG18219
₹350.00
Customer Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “कुर्यात सदा मंगलम्!”
You must be logged in to post a review.