मित्रमयजगत

-Binding: Paperback
-ISBN13: 9789390869497
-Language: Marathi
-Publication Year: 2021
-Author: Prakash Akolkar
-Product Code: VPG19216

250.00

पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी मुंबईत पत्रकारितेत चार दशके व्यतित केली. आपल्या बातमीदारीच्या संपन्न अनुभवात भेटलेल्या माणसांची व्यक्तिचित्रे त्यांनी या पुस्तकात रंगवली आहेत. त्यात गोविंद तळवलकरांसारखे साक्षेपी संपादक, दिनू रणदिवेंसारखे हाडाचे बातमीदार, बाळासाहेब ठाकरे ते शरद पवार असे स्वतःचा ठसा निर्माण केलेले बडे नेते, देव आनंद, सुनील दत्त यांच्यासारखे कलावंत भेटतात. अकोलकर मूळ नाशिकचे, तेथील मूळ वाड्याच्या, तेथे घडलेल्या संस्कारांच्या, जडणघडणीच्या आठवणी त्यांनी जाग्या केल्या आहेत. बातमीदारी करताना जागवलेल्या रात्रींचे किस्से सांगितले आहेत. अकोलकरांची भावगर्भ व ललितरम्य शैली, ओघवती भाषा व ठोस भूमिका यांमुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. चार दशकांत पत्रकारितेची बदलत गेलेली रूपेही इथे नकळत उलगडलेली आहेत.

Brands
प्रकाश अकोलकर यांनी महाराष्ट्र टाइम्स या सुप्रतिष्ठित दैनिकात विविध पदांवर काम केले. त्यांना राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील बातमीदारीचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांचे 'झोत', 'प्रसंग', 'पेनड्राइव्ह' असे वृत्तपत्रातील स्तंभ गाजले आहेत. बातमीदारी करताना 'शिवसेना' हा त्यांचा अभ्यासविषय बनला. शिवसेनेच्या इतिहासाचे जिवंत चित्रण करणारा 'जय महाराष्ट्र' हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. 'मुंबई ऑन सेल' या पुस्तकात त्यांनी राजकारणी, नोकरशहा आणि कंत्राटदार यांनी मुंबईत काय केले, याचे घणाघाती चित्रण केले आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मित्रमयजगत”