न्यायमूर्ती
न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे ह्यांच्या जीवनावर आधारित ‘न्यायमूर्ती’ ही कादंबरी आहे.
रामशास्त्री प्रभुणेंचे संक्षिप्त चरित्र ह्या पुस्तकातून आपल्यासमोर येते.
विद्यार्थिदशेपासून ‘न्यायमूर्ती’ पदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आणि पेशवे दरबारी ‘न्यायमर्ती’ म्हणून त्यांची घडलेली कारकीर्द आणि ते करताना घेतलेले महत्त्वपूर्ण असे निर्णय अशा या गोष्टी साध्या, सरळ शैलीतून उलगडल्या जातात.
नि:स्पृह निर्भीड, आणि कर्तव्यकठोर अशा रामशास्त्रींसार‘या महान न्यायमूर्तींचा परिचय आजच्या पिढीला होण्याच्या दृष्टीने हे पुस्तक आपल्या संग‘ही असायलाच हवे.