रंग पूर्वेचे
ज्योती म्हात्रे यांच्या परदेशभ्रमणाच्या अनुभवांचे हे पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आशिया ह्या खंडांतील देशांची सफर घडवली आहे. तसेच, आर्क्टिक व अंटार्क्टिका यांचीही सफर त्यांनी घडवली आहे. तेथील जगप्रसिद्ध ठिकाणांचे वर्णन व माहिती त्यांनी दिली आहे. मात्र, केवळ प्रवासवर्णन इतकेच त्याचे मर्यादित स्वरूप नाही, तर प्रत्येक देशाचे सामाजिक, आर्थिक, भौगोलिक कंगोरे वाचकांसमोर उलगडले आहेत. लेखिकेच्या विचारांना चिंतनाची बैठक लाभल्यामुळे प्रत्येक देश अधिक जवळून अनुभवता येतो. या अनुषंगाने, लेखिकेची ज्ञानार्जनाची आवड, इतिहासाची आवड, तसेच आनंद देण्या-घेण्याची प्रवृत्ती हे स्वभावविशेषही अधोरेखित होतात. हे पुस्तक वाचताना वाचकांना त्याचा प्रत्यय येतो. जगाच्या सातही खंडांच्या प्रवासाचा अनुभव लेखिकेच्या गाठीशी आहे. त्यामुळे या लेखनाला विशिष्ट उंची प्राप्त झाली आहे. जगाच्या पूर्वेकडील देशांचे हे रंग वाचकांना आनंद तर देतातच, शिवाय प्रवासालाही प्रोत्साहन देतात.
Be the first to review “रंग पूर्वेचे”
You must be logged in to post a review.