Rangadya Durgavaibhavacha Khajina-रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना [ कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले ]

Vishwakarma Publications

Mobile -9168682204

ISBN-9789390869541

175.00195.00

Compare

शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार असलेले महाराष्ट्रातील गडकोट फिरणे, तिथे इतरांना घेऊन जाणे, त्यासंबंधीची माहिती अभ्यासून त्यावर लेखन- जनजागरण करणाऱ्या इतिहासप्रेमींपैकी संदीप भानुदास तापकीर एक होत. पन्हाळा किल्ल्याचे स्थान आणि महत्त्व लक्षात घेऊन शिवछत्रपतींनी स्थापन केलेला पन्हाळा, त्याच्या ऐतिहासिक कामगिरीसह नव्या पिढीसमोर येण्याची गरज आहे. त्या दृष्टीने तापकीर यांनी ‘रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले’ या आपल्या पुस्तकात दिलेली माहिती खूप मोलाची आणि उपयुक्त आहे.

पन्हाळा, विशाळगडाबरोबरच तुपाची विहीर असलेला पावनगड, अणुस्कुराजवळचा निबिड जंगलातील मुडागड आणि दाजीपूर अभयारण्यातील शिवगडाची माहिती देऊन तापकीर यांनी शिवभक्तांना आणि अभ्यासकांना या दुर्लक्षित किल्ल्यांचा परिचय करून दिला आहे. आमच्या जाज्वल्य इतिहासाच्या प्रेरणा या गड- कोट-स्मारकांत आहेत. संदीप तापकीर हे सातत्याने गडकोटांच्या अभ्यासाचा जागर करून निष्ठेने पुढे जात आहेत. त्यांनी आपला हा प्रेरणादायी वारसा समाजासमोर मांडण्यासाठी केलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक.

डॉ. सागर देशपांडे

(ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक, मासिक जडण-घडण)

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Rangadya Durgavaibhavacha Khajina-रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना [ कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले ]”