सप्तरंगी फौज
इंडोनेशियातील बेलिटांग बेटावरच्या कथिलाचे खाणकाम करणाऱ्या एका खेडेगावातील मुहम्मदियन स्कूल या जुन्या आणि गरीब शाळेतील दहा विद्यार्थ्यांपैकी इकाल हा एक विद्यार्थी होता . त्याच्याप्रमाणेच शाळेतील सर्वच विद्यार्थी हे त्या भागातील अत्यंत गरीब घरातून आलेले होते; परंतु या शाळेकडे दोन महत्त्वपूर्ण अस्त्रे होती. एक म्हणजे, बु मुस या शिक्षका. दुसरे अस्त्र म्हणजे लिटांग . हा जात्याच अलौकिक बुध्दिमत्ता लाभलेला विद्यार्थी होता. तो आपल्या वर्गमित्रानां स्वप्ने पाहण्याची आणि नियतीशी लढा देण्याची प्रेरणा द्यायचा . लवकरच या बेटावरचे सर्वांत दुबळे लोक त्या बेटावरचे सर्वांत शक्तिशाली लोक बनतात. अगदी ह्रदयस्पर्शी आणि हेलावून सोडणारी, परंतु आशेच्या प्रकाशाने भारलेली ही कथा.
लेखकाविषयी अँड्रिया हिराता – हिराता यांचा जन्म बेलिटांग बेटावर झाला. त्यांनी इंडोनेशिया विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतली असून युरोपियन युनियनकडून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी पदव्युत्तर पदवी युरोपमधून घेतली. हिराता यांची लास्कर पेलांगी ही कादंबरी २००५ मध्ये प्रकाशित झाली, जी त्यांनी अवघ्या ६ महिन्यांत लिहिली होती. याचबरोबर त्यांच्या सांग पेमीम्पी , एडेंसोर , माऱ्यामाह कार्पोव , सेबेलास पॅट्रीऑट , आयः हि पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
Be the first to review “सप्तरंगी फौज”
You must be logged in to post a review.