स्माईली मुशाफिरी

– Binding: Paperback
– ISBN13: 9789386455109
– Language: Marathi
– Publication Year: 2017
– Author: Pallavi Akolkar
– Product Code: VPG17160

200.00

स्माईली मुशाफिरी

जगताना आपल्या साथीला असतो, आपला आजचा आणि कालचा काळ आणि असतात उद्याची स्वप्नं, आपल्यासोबत असतात जवळची-लांबची, ओळखीची -बिनओळखीची असंख्य माणसं, सुख-दु:खाचे अनुभवलेले क्षण, वेगवेगळे मूड्स आणि असं बरंच काही… या सार्‍यांतून घडते आपली जगण्याची मुशाफिरी.
या संग्रहात लेखिकेने जगण्याच्या मुशाफिरीतली स्पंदनं टिपली आहेत. बदलत्या काळाच्या कंगोर्‍यांना स्पर्श केला आहे. जगण्याच्या बदललेल्या आणि न बदललेल्या तर्‍हा दाखवल्या आहेत. नात्यांच्या कडू-गोड गाठी उलगडल्या आहेत आणि स्मरणरंजनात रंगही भरला आहे.
हे सारं तिनं मिश्कीलपणे आणि तितकंच मार्मिकपणे केलं आहे. तुम्हा-आम्हा सर्वांच्या जगण्याच्या मुशाफिरीचं प्रतिबिंब यात उमटलं आहे.