कंबोडिया म्हटलं की, अद्भुत असा मंदिरांचा देखणा खजिना डोक्यांसमोर येतो, पण सुंदर वास्तुशिल्पांबरोबरच कंबोडियाला संस्कृतीचे अनेकविध तरल असे पदरही आहेत, कंबोडिया आणि भारत नागसूत्रानेही बांधलेले आहेत. तो संबंध लेखिका सीधतिनी नूलकर यांनी सोपा करून मांडला आहे. अखंड खळखळणारी मेकींग, तिचे महत्त्व, त्यातील दंतकांबरोबरच जलचरांचे महत्त्व, त्यांचे स्थलांतर व त्याबरोबरच नदीच्या सानिध्यात राहणाऱ्या मानवी जमाती यांचं निसर्गाशी असलेलं जवळचं नातं रंजक आहे. वास्तुकलेचा अप्रतिम नजारा आणि त्याच्याशी संलग्न तीनले सँप है गोडे सरोवर व तरंगत्या गावाची सफर आगळावेगळा अनुभव देते. कंबोडियातील खाद्यसंस्कृतीचा आढावा वेगळा असला, तरी शिरशिरी आणणारा आहे. कंबोडिया ही सर्वांगाने अनुभवण्याची जागा आहे. कंबोडियातील अंगकोरवाट, जलाशये, कालवे हा तपशील, स्थापत्यकला, वास्तुकला आणि नगरविन्यासाच्या अभ्यासाचा भाग आहे. लेखिकेच्या लेखनाचा भर कंबोडियाच्या प्रसिद्ध वास्तुकलेच्या अंगाने ख्मेर व इतर, सांस्कृतिक, आध्यात्मिक, पौराणिक, तात्त्विक व सद्यः परिस्थितीतील जीवनव्यवहार हा आहे. या सर्वांचा भारतीय संस्कृतीशी जोडणारा दुवा अलगदपणे मांडला आहे. लेखिकेचे हे पुस्तक वाचताना त्यामुळेच त्या देशाबद्दलचा, त्या देशाकडे बघण्याचा समतोल दृष्टिकोन जागृत ठेवतो. अंजली कलमदानी (वारसा वास्तू जतन-संवर्धनकार, वास्तुविशारद, नगरविन्यासकार)
Suvarnbhumi Cambodia -सुवर्णभूमी कंबोडिया संस्कृतीच्या पाळामुळात लपलेलं सौंदर्य
- ASIN : B0DZC2T6VF
- Publisher : Vishwakarma Publications; First Edition (2 March 2025)
- Language : Marathi
- Paperback : 96 pages
- Reading age : 10 years and up
- Item Weight : 95 g
- Dimensions : 14 x 1 x 21 cm
- Country of Origin : India
- Packer : Vishwakarma Publications
- Generic Name : Books
save
₹25.00₹125.00₹150.00
Customer Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “Suvarnbhumi Cambodia -सुवर्णभूमी कंबोडिया संस्कृतीच्या पाळामुळात लपलेलं सौंदर्य”
You must be logged in to post a review.