स्वास्थ्य संवर्धन ध्यानसाधना (मेंदू-संशोधनाधारित)
आनंदी, चैतन्यमय, शाश्वत आणि निरंतर अशा अव्यक्त तत्त्वातून संपूर्ण चराचर सृष्टीची निर्मिती झाली, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. माणसाची व्युत्पत्तीही अशा चेतन तत्त्वातूनच झाली, असे म्हणता येते. चैतन्य हे माणसाच्या सर्व अंतर्बाह्य अवयवांना जिवंतपणा पुरवते; मात्र सध्याच्या काळात सर्वांचीच विज्ञाननिष्ठा जागृत झालेली आढळते. माणसाच्या याच प्रवृत्तीची जिज्ञासा या पुस्तकाच्या वाचनाने शमणार आहे. हे पुस्तक वाचकांपर्यंत मेंदू-संशोधनात्मक माहिती पोहोचवते. त्याचप्रमाणे शरीर-मनाच्या व्याधींवर उपयुक्त ठरू शकतील, असे ध्यानाचे प्रकार, ध्यानाच्या विविध पद्धती यांविषयी हे पुस्तक मोलाचे मार्गदर्शन करते. यामुळे बुद्धीची निर्णायकता, विवेकताही सुलभ करता येते आणि मग चित्ताची शुद्धी साधल्याने ‘मी’पणाच्या भावनेतून बाहेर येऊन संघभावना, सर्वात्मकता आणि विश्वात्मकता साधता येते. नियमित ध्यानसाधनेच्या प्रत्यक्ष अवलंबनाद्वारे मनुष्य आत्मसाक्षात्काराप्रत पोहोचू शकतो, हाच मूल-गाभा हे पुस्तक वाचकांसमोर उलगडते.
Be the first to review “स्वास्थ्यसंवर्धक ध्यानसाधना (मेंदू-संशोधनाधारित)”
You must be logged in to post a review.