वीर भरारी
1971 चे भारत – पाक युद्ध अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरले. या युद्धात हवाई दलाचे काही अधिकारी युद्धकैदी म्हणून पाकच्या तावडीत सापडले. त्यांच्यापैकी ग्रुप कॅप्टन (निवृत्त) दिलीप परुळकर यांनी पाकिस्तानच्या हातावर तुरी देऊन मोठ्या शिताफीने त्यांच्या तुरुंगातून आपल्या इतर दोन सहकार्यांसह सुटका करून घेतली आणि भारतात परतण्याच्या मार्गावर आगेकूच सुरू केली. आपल्या दोन सहकार्यांच्या साहाय्याने शत्रूच्या तुरुंगातून निसटणारे ते आजतागायतचे हवाई दलातील एकमेव अधिकारी आहेत. त्यांनी सुटकेची महत्त्वाकांक्षी योजना कशी आखली? तिला कसा आकार दिला? शत्रूच्या हाती पुन्हा सापडल्यावर काय झाले? धैर्य, धाडस, प्रसंगावधान आणि थरार असलेल्या अनेक प्रसंगांनी भरलेली दिलीप यांच्या शौर्याची रोमहर्षक कथा.
Be the first to review “वीरभरारी”
You must be logged in to post a review.