Vidnyan Ani Tantradnyan : Apekshya Ani Vastav (विज्ञान आणि तंत्रज्ञान : अपेक्षा आणि वास्तव)

Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications; First edition (1 January 2022)
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 224 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9393757828
ISBN-13 ‏ : ‎ 978-9393757821
Item Weight ‏ : ‎ 203 g
Dimensions ‏ : ‎ 21.5 x 14 x 1.5 cm
Country of Origin ‏ : ‎ India

310.00

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा विस्तृत आढावा लेखकाने या पुस्तकात घेतला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समर्पक आढावा घेणारे मराठीतील हे पहिलेच पुस्तक असावे. हे केवळ माहितीपर पुस्तक नसून, यात विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक धोरणांचा ऊहापोह केला आहे. भारताने स्वीकारलेल्या धोरणांमध्ये काही कालसापेक्ष बदल होणे अनिवार्यच आहे. भारताने आतापर्यंत केलेली प्रगती स्पृहनीय असली, तरी एकविसाव्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी अधिक जोमाने पुढे जाण्याची गरज या पुस्तकात अधोरेखित केली आहे आणि ती योग्यच आहे.

डॉ. पंडित विद्यासागर यांनी या पुस्तकातही विषयाची मांडणी सूत्रबद्ध पद्धतीने केली आहे. पुस्तकाची भाषा ओघवती असून, त्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. सामान्य जिज्ञासू वाचकांप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठीही या पुस्तकाचा उपयोग होईल. मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा परिचय मराठी भाषेतून करून देणे आवश्यक आहे. ही गरज डॉ. पंडित विद्यासागर यांनी ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान : अपेक्षा आणि वास्तव’ या पुस्तकाद्वारे पूर्ण केली आहे. या योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर (ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी डायरेक्टर जनरल, सीएसआयआर)

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vidnyan Ani Tantradnyan : Apekshya Ani Vastav (विज्ञान आणि तंत्रज्ञान : अपेक्षा आणि वास्तव)”