चाणक्याची जीवनसूत्रे
महागुरू आर्य चाणक्य यांच्या ‘चाणक्य-नीती’ या ग्रंथामधील निवडक सूत्रांवर आधारित हे पुस्तक आहे.
त्यामधून समाजात वावरताना ‘माणूस’ म्हणून नेमक्या कोणत्या तत्त्वांचा अंगीकार करायला हवा अथवा कोणत्या बाबी ध्यानात घ्यायला हव्यात ह्या अनुषंगाने ती सूत्रे आपल्याला मार्गदर्शन करतात.
चाणक्यांनी प्रतिपादलेली सूत्रे आजच्याही काळाच्या संदर्भात निश्चितच उपयुक्त ठरणारी आहेत.
आजच्या काळाच्या दृष्टीने उदाहरणांसह विस्तृत विवेचन करून ही तत्त्वे लेखकांनी सोप्या भाषेत मांडलेली आहेत. हे या पुस्तकाचे लेखनवैशिष्ट्य आहे.
चाणक्यांची जीवनसूत्रे आपल्याला जीवन जगण्याची कला कशी आत्मसात करावी, ह्याचा जणू मंत्र देतात.