आनंदी पालक , आनंदी बालक
पहिल्या दोन पुस्तकांच्या यशानंतर किंजल गोयल यांचं तिसरं पुस्तक प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकाचा विषय आहे – पालकत्व आणि सर्वांना करावाच लागतो- तो रोलर कोस्टरचा प्रवास. ‘नो किडिंग!’ हे पुस्तक आनंद, समाधान आणि अपराधभावनेतून मुक्त असं मोकळं आयुष्य जगणं याविषयी बोलतं. लहानपणापासून ते कुमारवयीन मुलांपर्यंत, पौगंडावस्थेपासून ते मोठ्या झालेल्या मुलांपर्यंत – मुलांना वाढवणं हा एक जिकिरीचा; पण तितकाच उत्सुकतेचा, एक वेगळाच अनुभव आहे.
चला तर. हे पुस्तक वाचून ‘आपण कसे पालक आहोत’? हे बघू या. सध्या आपलं नेमकं काय आणि कसं चालू आहे, हे बघा. कोणत्याही वयोगटाची मुलं आणि पालक त्रासलेले असतील, तर यातल्या काही उपायांचा अवलंब करा. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न करा. मुलांवर प्रेम करतानाच स्वत:वर आणि जोडीदारावरही प्रेम करायला शिका. तुमच्या पूर्ण कुटुंबात आनंद भरून राहू दे.
Be the first to review “आनंदी पालक, आनंदी बालक”
You must be logged in to post a review.