काठमांडूच्या रस्त्यावरून

– Binding : paperback
– ISBN13 : 9789383572854
– Language : Marathi
– Publication Year : 2016
– Author: Basu Rai
– Product Code: VPG16066

340.00

Compare

<h3>काठमांडूच्या रस्त्यावरून</h3>

एक छोटा मुलगा आपल्या घराच्या पायर्‍यांवरून खाली उतरला आणि घराबाहेर पळून गेला. बहुतेक लहान मुले असे करतात. परंतु या लहान मुलाला रोखण्यासाठी कोणीही नव्हते. त्याला नाव नव्हते. त्या लहान मुलाचे वडील त्या मुलाला आपल्या मृत्यूपर्यंत एक कहाणी सांगत राहिले होते. हा मुलगा सहा महिन्यांचा असल्यापासूनच ते ती कहाणी त्याला सतत सांगत राहिले होते. त्याच्या मनात तेवढ्या एकाच गोष्टीची स्मृती होती. वडील मरण पावले त्यावेळी हा मुलगा फक्त चार वर्षांचा होता. या मुलाच्या वडलांच्या प्रेमाची आणि त्यांच्या झालेल्या विश्‍वासघाताची ही कथा आहे.

‘फ्रॉम द स्ट्रीट्स ऑफ काठमांडू’ ही बासु राय असे नाव स्वतःला घेणार्‍या मुलाची कथा आहे. त्याने जगप्रवास केला. बालकामगारीच्या विरुद्ध काढण्यात आलेल्या जागतिक पदयात्रेत सहभाग घेतला आणि अखेरीस आपल्या स्वतःच्या देशात तो परतला. त्याचा हा देश होता – भारत.

बासुला आपला देश सापडला असला तरीही त्याची कुटुंबाची तहान भागली नाही. या पुस्तकाबरोबरच त्याच्या ओळखीचा शोधही सुरू झाला आहे. एका संपन्न कुटुंबातील अबोल बालकापासून रस्त्यावरचे हिंसक मूल आणि बालकामगारापर्यंत झालेल्या या मुलाच्या जीवनाच्या प्रवासातील टप्प्या-टप्प्यांचा नकाशा या पुस्तकात मांडला गेला आहे. हा मुलगा कित्येक वेळा मृत्यूच्या जबड्यातून परतला आहे. शाळेत जाता यावे म्हणून त्याने केलेला संघर्ष आणि अखेरीस 26 वर्षांचा झाल्यावर पुस्तकातून आपली कहाणी त्याने सांगणे हे सारेच थक्क करणारे आहे.

ही एक प्रेरणादायी कथा आहे. वडलांकडून या मुलाचा कसा सांभाळ झाला ते हे पुस्तक सांगते. खरे तर राज्य सरकारकडूनही अशा मुलांचा सांभाळ केला गेला पाहिजे. परंतु त्याचा इथे पूर्णतया अभाव दिसतो. आपले उपखंड या सगळ्या गोष्टींविषयी शेखी मिरवत असले तरी प्रत्यक्षात ते खरे नाही. ज्या अंधार्‍या पोकळीत मोठे होण्याची मुलांवर जबरदस्ती केली जाते, तिच्याकडे या पुस्तकातून बोट दाखवले गेले आहे. अगदी शून्यातून एक ज्ञानी, माहितगार आणि शिक्षित तरुण नागरिक मिळणे ही गोष्टही नक्कीच चमत्काराहून कमी नाही.

“बळी पडलेल्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी छोट्या मोठ्या मार्गांनी सहभागी होऊ इच्छिणार्‍या प्रत्येकाने हे प्रेरणादायक पुस्तक वाचलेच पाहिजे.”

– अनु आगा
टीच फॉर इंडियाचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “काठमांडूच्या रस्त्यावरून”