डिजिटल चतुर व्हा
माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी म्हणून ओळखले जाणारे डॉ. दीपक शिकारपूर यांचे हे पुस्तक आहे.
आजच्या डिजिटल युगात आपले जीवन सुसह्य करण्याचे काम संगणक करत आहे. विविध नित्योपयोगी वस्तू आता स्मार्ट होऊ लागल्या आहेत. संगणकाधारित तंत्रज्ञानाची सांगड दैनंदिन बाबींशी घातली जाऊन त्याचा वापर सुलभ झाला आहे. हा त्या पुस्तकाचा गाभा आहे.
अनेक क्षेत्रांत अनेक व्यवहार आपण घरबसल्या म्हणजेच ऑनलाइन आणि डिजिटली कसे करू शकतो, याबाबतची उपयुक्त माहिती सोप्या भाषेतून हे पुस्तक आपल्याला देते. प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही हे पुस्तक उपयुक्त असे आहे.
कॅशलेस व्यवहार, ऑनलाइन अर्थव्यवस्थापन, डिजिटल तिकीट आरक्षण, आरोग्याच्या दृष्टीने सॉफ्टवेअरचा वापर अशा अगदी कळीच्या घटकांबद्दलची माहिती पुस्तकात समाविष्ट झालेली आहे. जेणेकरून, डिजिटल तंत्रज्ञानापासून कोणीही दूर राहू शकणार नाही. उलट, ते आपल्या आयुष्याचाच एक अविभाज्य घटक होईल. याबाबतचे मार्गदर्शन इथे येते.
Be the first to review “डिजिटल चतुर व्हा”
You must be logged in to post a review.