टेन्शन नको अभ्यासाचे
‘टेन्शन नको अभ्यासाचे’ या पुस्तकामध्ये विद्यार्थिवर्गाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्याच्या दिशेचे अचूक मार्गदर्शन मिळते.
प्रस्तुत पुस्तकात लेखकाने व्यक्त केलेला अध्ययन-प्रक्रियेचा समग्र विचार आपल्यासमोर येतो.
अभ्यास करण्यासाठीची पूर्वतयारी, विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता तसेच वाचन, चिंतन, टीपण अशा सर्व पायर्यांचे लेखकाने बारकाईने लेखन केले आहे.
याव्यतिरिक्त अभ्यासात अडथळे निर्माण करणार्या गोष्टी टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा सूचनाही केल्या आहेत.
आजच्या स्पर्धात्मक युगात कुठलाही विद्यार्थी हा कुठल्याच बाबतीत कमी किंवा मागे पडणार नाही, यादृष्टीने लेखकाने अतिशय नेमक्या शब्दांत आणि मुद्देसूद मांडणीमध्ये योग्य मार्गदर्शन केले आहे. ही या पुस्तकाबाबतची विशेष उल्लेखनीय अशी गोष्ट आहे.
कुठलाही अभ्यास सहज-सुलभ कसा करता येईल, याचा जणू गुरुमंत्रच हे पुस्तक देते.
Be the first to review “टेन्शन नको अभ्यासाचे”
You must be logged in to post a review.