वेध अंतरळाचा
आकाशात लुकलुकणारे तारे पाहायला किती छान वाटते ना ? आकाशात घडणाऱ्या उल्कावर्षाव , गहणे , युती अधिक्रमणे इ. घटनांबद्दल सगळ्यांनाच कुतूहल असते . मात्र त्यांच्या मुळाशी असणाऱ्या खगोलशास्त्रीय संकल्पना तुह्माला ज्ञात आहेत का ?
तर मग ‘वेध अंतरळाचा‘ हे पुस्तक तुह्माला त्या अनुषंगाने अंतरिक्षाची सफर घडवून आणले . तारे नक्षत्र राशी तारकासमूह यांच्याबद्दलच्या माहितीबरोबरच त्याच्याशी संबंधित कथांचा परिचय हे पुस्तक घडवून देईल .सोप्या ओघवत्या आणि काव्यात्म अशा शैलीत गुंफलेल्या माहितीपटातून आपण जणू आंतराळाची सफर करून येतो .
- खगोल विश्वातील घडामोडीवरील हे पुस्तक आहे.
- सामान्य वाचकाला आकाशातील अनेक तारे – तारकांबाबत कुतूहल असते . त्यांचे कुतूहल शमविणारी माहिती रंजक पद्धतीने लेखिकेने यात मांडली आहे.
- आकाशगंगा , कृष्णविवर न्यूट्रॉन तारे , ताऱ्यांचे रंग , अवकाशातील अंतरे इ. विषयांची माहिती या पुस्तकात दिली आहे.
- लेखांच्या शेवटी छोट्या छोट्या कविता दिल्या आहेत. कवितेतून आकाशदर्शनचा हा पहिलाच अभिनव प्रयोग आहे.
Be the first to review “वेध अंतराळाचा”
You must be logged in to post a review.