पॉलिकिलर्स -व इतर विज्ञानकथा
विज्ञान गतिक म्हणजेच डायनॅमिक आहे. जगामध्ये वैज्ञानिक अभ्यास संशोधन आणि प्रयोगांमुळे सतत बदल होत आहेत काही बदल हे जीवन सुलभ करू शकतात , तर काही बदल हे भयावह आहेत. आजच्या शोधांचा पाय मात्र काही पिढ्यांपूर्वी कल्पक विज्ञान लेखकांनी घालून ठेवलेला आहे. जूल्स व्हर्न आणि आर्थर लेखकांनी आपल्या विज्ञान काल्पनिकांतून मांडलेल्या विचारांनी आज सत्य स्वरूप साकारलं आहे. हे नाकारता येणार नाही मात्र वैज्ञानिक शोधाचं उपयोग मनुष्य जीवन सुधारण्याकरता करायचा, कि स्वार्थी आणि दृष्ट कृतीसाठी करायचा हे सर्वस्वी मनुष्य स्वभावावर अवलंबून आहेआणि त्यात मानवी आशा – आकांशाची
भूमिका दडलेली आहे.
या संग्रहातील विज्ञानकथांमध्ये कल्पनांचा आविष्कार तर आहेच, पण मानवी मूल्यांमुळे त्या कल्पना कुठला आकार वा विकार घेतात तेही या कथांमध्ये दिसून येते. या कथांमधील विज्ञान भविष्यात वास्तवात येऊ शकतात. वाचकांना खिळवून ठेवण्याची विलक्षण ताकद त्यांच्यात आहे.
Be the first to review “पॉलिकिलर्स आणि इतर विज्ञानकथा”
You must be logged in to post a review.