‘ब्रँड फॅक्टरी’ या आजच्या काळाचा वेध घेणार्या कथा आहेत. आजच्या काळातील सामान्य माणसांच्या या कथा आहेत. जागतिकीकरणातून अवतरलेल्या बाजारयुगाच्या भूलभुलैय्यात माणसं हरवली आहेत. एकीकडे स्वप्नांची झगमगती दुनिया आहे, चमकदार जगण्याची मोहिनी पडली आहे. जगण्याचं मान बदललेलं आहे आणि त्यात जगण्याचं भान हरवून गेलं आहे. जणू तारा अगदी हाताशी आहे, पण तो हातात येत नाहीये, अशी अवस्था! त्यासाठी जीवघेणी स्पर्धा, प्रचंड दमछाक आणि घुसमट! जगण्याचा झगडा तीव्र झाला आहे आणि त्यात केवळ फरफट दिसत आहे.
या सगळ्या उलथापालथीत माणसातून हरवत चाललेला ‘माणूस’ या कथा अधोरेखित करीत आहेत. या कथा विचारत आहेत, आपण अजून ‘माणूस’ आहोत ना? आपला ‘ब्रँडेड रोबो’ तर झाला नाही ना?
मनोहर सोनवणे यांच्या लिखाणात प्रचारकी थिल्लरपणा नाही. ते तटस्थ आहेत अन संवेदनशीलही. त्यामुळे ‘ब्रँड फॅक्टरी’ला कलात्मक मूल्य प्राप्त झालंय, यात शंका नाही.
– अंबरीश मिश्र
मनोहर सोनवणे यांचं लिखाण म्हणजे एका संवेदनशील मनाने आपला भोवताल टिपल्यानंतरची स्पंदनं आहेत. त्यात आपल्या भोवतालाचं सूक्ष्म निरीक्षण आहे आणि त्या भोवतालात गुंतलेल्या आर्थिक-सांस्कृतिक धाग्यांची खोल जाणीवही आहे.
– वसंत आबाजी डहाके
Be the first to review “ब्रँड फॅक्टरी”
You must be logged in to post a review.