कोव्हिडमुक्तीचा मार्ग

-Binding: Paperback
-ISBN13: 9789390869770
-Language: Marathi
-Publication Year: 2021
-Author: Dr. Deepak Mhaisekar
-Product Code: VPG19201

175.00

कोव्हिडमुक्तीचा मार्ग
सन २०२० या वर्षाची सुरुवात कोरोना (कोव्हिड-१९) या आजाराच्या उद्भवाने झाली. पुढे या संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या छायेने अवघे विश्व व्यापले. परिणामी, कोव्हिडमुक्तीच्या दिशेने संपूर्ण विश्वाचा खडतर असा प्रवास सुरू झाला, तो अजूनही सुरूच आहे. या संपूर्ण प्रवासातील अनेक स्थित्यंतरे, समस्या, तसेच एकूणच जीवनमानावर त्याचा दिसून आलेला प्रभाव ह्यांसारख्या महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांना हे पुस्तक स्पर्श करते. या अनुषंगाने लसींची उपलब्धता, लस घेण्याबाबत लोकांच्या मनातील साशंकता, तसेच हर्ड इम्युनिटी खरोखरच तयार होईल का, असे महत्त्वपूर्ण संदर्भ स्पष्ट करते.

त्याचप्रमाणे, मास्क वापरणे, हात धुणे व सामाजिक-भौतिक अंतरभान राखणे ही त्रिसूत्री आणि त्यासोबत लसीकरण हे अत्यावश्यक घटक या पुस्तकात चर्चिले गेले आहेत. कोव्हिड-१९ संदर्भात अत्यंत वस्तुनिष्ठ स्वरूपात समग्र माहिती या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर येते. कोव्हिड-१९ रोगाबाबत जनमानसामध्ये असणाऱ्या गैरसमजुती, अपप्रचार व शंका दूर करणारे मार्गदर्शनपर पुस्तक. कोव्हिड प्रश्नग्रस्तांसाठी विश्वासाची, अभ्यासपूर्ण आणि वैज्ञानिक माहिती देणारे पुस्तक.

SKU: VPG19207
Categories:,
Brands
डॉ. दिपक म्हैसेकर हे प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी असून महाराष्ट्र शासनामध्ये त्यांनी ३२ वर्षांहून अधिक काळ महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या ते मुख्यमंत्र्यांचे कोव्हिडविषयक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कोव्हिडमुक्तीचा मार्ग”