तशी ही अगदी साधी गोष्ट आहे. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य ‘संदीप’ची! संकटे येतात…. त्याच्यावरही आले. करायला गेला एक आणि घडले भलतेच. विध्वंसाच्या व मृत्यूच्या प्रचंड हल्ल्यात तो अडकला.
कसा…. ते फार महत्त्वाचे नाही. त्यानंतर जे घडत गेले, ते महत्त्वाचे आहे. रुद्र, भीषण असले, तरी रमणीय आहे. ही रमणीयता आहे, त्याच्या व्यक्तिमत्त्वातल्या त्यालाच माहीत नसणाऱ्या लढवय्याच्या यशाची… लढ्याची… अपयशाची…. यशाची… माघारीची… पुन्हा उठून चालू लागणाऱ्या विजिगीषू वृत्तीची!
असा लढा असला, तर हिमालयही ठेंगणा वाटू शकतो. मनातली एक ठिणगी आयुष्य उजळवून टाकू शकते. प्रेरणा बनून जीवन घडवू शकते.
त्या ठिणगीचे हे चित्रदर्शी शब्दरूप … एकदा स्पर्शले, तर हमखास मनात शिरून स्वतःचे घर निर्माण करणार आणि कायम वस्तीला राहणार…..
मग भेटताय ना संदीपला आणि त्याच्या सहकाऱ्यांना … जरूर भेटा! ही भेट तुमच्याही मनात एक उत्तुंग प्रतिमा निर्माण करेल.
Be the first to review “Lava Ani Hirval (लाव्हा आणि हिरवळ)”
You must be logged in to post a review.