श्री. दीपक करंदीकर कवी, गझलकार व लेखक म्हणून चार दशकांपासून सुपरिचित आहेत. मराठी साहित्यविश्वातील महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या प्रमुख संस्थेचे ते स्थानिक कार्यवाह आहेत. हे पद ते गेली तीस वर्षे भूषवित आहेत.
‘धुनी गझलांची’ (२००१), ‘कविकुल’ (२००९) हे गझलसंग्रह व कवितासंग्रह प्रकाशित झाले असून, ‘गझलगंगा’ हा गझलसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तसेच, ‘अभिनव श्रीव्यंकटेश माहात्म्य’ (२०१६), ‘संगीत श्रीनिवास-पद्मावती विवाह नाट्य’ – पाच अंकी संगीत नाटक (२०२०) ही श्री तिरुपतीवरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत.