डॉ. श्रुती वडगबाळकर यांनी एम.ए., एम.एड. आणि एम.फिल., पीएच.डी. या पदव्या संपादन केल्या आहेत. मराठी विषयातून त्या नेटची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी कथा, कविता, ललितलेख, नाटक, एकांकिका, समीक्षात्मक लेख, सदरलेखन, बालसाहित्य या प्रांतांमध्ये लीलया लेखन केले आहे. अनेक सेमिनार्स, चर्चासत्रांतून त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. अनेक व्याख्यानेही त्यांनी दिली आहेत. साहित्यिक कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत.